Header AD

भिवंडीत परराज्यातून तस्करीच्या मार्गाने आलेला एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त ;बुटांच्या आड गुटखा वाहतूक

 

भिवंडी , प्रतिनिधी  : महाराष्ट्रात प्रतिबंधित असतानाही मोठ्या प्रमाणावर परराज्यातून तस्करीच्या मार्गाने गुटखा ,सुगंधी तंबाखू जन्य पदार्थ चोरी छुपे मार्गे आणून विक्री केली जात असताना ठाणे अन्न सुरक्षा विभागाच्या भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत भिवंडी तालुक्यातील दापोडे येथे एक कंटेनर मधून मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक करून आणला जात असल्याची खबर मिळाली असता त्यांनी वरिष्ठ अधिकारी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे , कोकण विभागाचे सह आयुक्त सहाय्यक आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा विभागाच्या भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे व पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी शंकर राठोड,माणिक जाधव,मनीष सानप,अरविंद खडके या पथकाने दापोडा ग्रामपंचायत हद्दीत स्विद्दनाथ कंपाऊंड येथे गोदाम समोर उभी असलेल्या संशयित कंटेनर क्रमांक  MH 04 JK 8454 उभा असलेला आढळून आला असता त्या कंटेनर सह गोदमाची तपासणी केली असता त्या ठिकाणी चप्पल बूट च्या खोक्यां मागे मोयच्या प्रमाणावर गुटखा तस्करी मार्गाने आणलेला आढळून आला . मालाची तपासणी केली असता माणिकचंद,दिलबाग,
गोवा ,राज विलास ,हॉट या नावाने विकला जाणार गुटखा सुगंधी तंबाखू यांच्या तब्बल तीनशे गोणी आढळून आल्या असून सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्दमाल अन्न सुरक्षा विभागाने जप्त करून कंटेनर चालकास ताब्यात घेतले असून त्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात आहे .
भिवंडीत परराज्यातून तस्करीच्या मार्गाने आलेला एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त ;बुटांच्या आड गुटखा वाहतूक भिवंडीत परराज्यातून तस्करीच्या मार्गाने आलेला एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त ;बुटांच्या आड गुटखा वाहतूक Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads