प्रविण देशमुख लिखित ‘संस्मरण ज्योत’ पुस्तकाचे प्रकाशन
डोंबिवली , शंकर जाधव : कल्याणतील संघ कार्यकर्ते प्रविण देशमुख यांच्या ‘संस्मरण ज्योत’ या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन कल्याण पश्चिमेतील श्रीराम मंदिर, काळा तलाव सभागृहात जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडक यांच्या हस्ते मकरसंक्रातीच्या शुभमुहुर्तावर करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात वाडा महाविद्यालयाचे प्राचार्य नारायणराव फडके, विश्व हिंदू परिषदेचे दिनेश देशमुख, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा जोशी, अनेक तरूण स्वयंसेवक उपस्थित होते.
डॉ. मोडक म्हणाले, या पुस्तकातून सर्वाना संघाची योग्य माहिती मिळेल. या पुस्तकात संघाचे स्वातंत्र्य युध्दातील योगदान, हिंदूत्व, स्वामी विवेकानंद, पं.दिनदयाळ उपाध्याय, भारतरत्न डॉ. आंबेडकर व सहाही सरसंघचालकांची व्यक्तीचित्रे आहेत. संघाच्या सहा उत्सवांची माहिती व गीते आहेत. रामजन्मभूमीवर लिहिलेला पोवाडा आहे. वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
प्रविण देशमुख लिखित ‘संस्मरण ज्योत’ पुस्तकाचे प्रकाशन
Reviewed by News1 Marathi
on
January 15, 2021
Rating:

Post a Comment