कल्याण मध्ये दोन खारमिला पक्षांचा मृत्यू
कल्याण , कुणाल म्हात्रे : बर्ड फल्युच्या साथीने काही राज्यात पक्षी दगवल्याच्या घटना समारे येत असतानाच कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील गौरीपाडा प्रभागात नियोजित असलेल्या सिटी पार्क प्रकल्पानजीक रस्त्यावर दोन खारमिला (ढोकरी)प्रजातीचे पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने हा प्रकार बर्ड फल्युचा आहे की काय असा प्रश्न पडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास गौरीपाडा प्रभागातील गुरूआत्मन सोसायटी ३६० सर्कल डी.बी. स्कुल रस्त्याच्या लगत दोन खारमिला पक्षी मृत अवस्थेत पडलेले स्थानिक रहिवासी शैलक्ष भोईर, प्रदीप भोईर यांच्या निर्दशनास आले. त्यांनी तातडीने स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांना सांगितले असता त्यांनी घटनास्थळी तातडीने पोहचत पाहणी करीत क.डो.म.पा साथरोग आरोग्य विभाग यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात कळविले. घनकचरा विभागाला देखील कळवुन फवारणी बाबत सुचना केल्या.
गत आठवड्यात देखील पाच ते सहा बगळे मुत्यु पावल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. संदर्भीत परिसरानजीक पाणथळ जागा व पुढे शेतीची जागा नदीतीर, खाडीतीर असल्याने विविध पक्षांचा या परिसरात वावर असतो. पाणथळ जागेतील चिखलातील कीटक, किडे हे पक्षाचे आवडते अन्न असल्याने पक्षीप्रेमींच्या दुष्टीकोनातुन हा परिसर आवडीचे ठिकाण आहे. परंतु बर्डफ्ल्यूचे संकट पाहता पक्षांवर देखील संकट कोसळल्याचे समजते.
मृत पावलेले पक्षी आढळल्यास ते आम्हांस कळवा त्यांस हात लावु नका असे आढळल्यास याबाबत मनपाला कळवुन योग्य ती दखल घेत काळजी घेतली जाईल अशी सूचना स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांनी नागरिकांना केली आहे.
"या घटने संर्दभात साथ रोग आधिकारी डाँ.प्रतिभा पानपाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटने संर्दभात कल्याण पशुवैद्यकीय विभाग कल्याण, तसेच ठाणे येथे कळविले असुन त्याबाबत त्यांनी सर्व्हे केलेल्या, अंतिम अवाहालात दोन खारमिला (ढोकरी) पक्षांच्या मृत्यूचे कारण समजेल.

Post a Comment