Header AD

भिवंडीत आदिवासी पाडयात वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत केले ध्वज वंदन

 

 


भिवंडी , प्रतिनिधी   :  देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला . यंदा कोरोना संकटामुळे मोठा गाजावाजा नसला तरी कोरोना संदर्भातील नियम पळून ठीक ठिकाणी देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला . शाळा , महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून ध्वज वंदन करण्यात आले . मात्र भिवंडी तालुक्यातील अंजूर येथील आदिवासी पाड्यावर असलेल्या वीटभट्टीवर जाऊन वीटभट्टी मजुरांच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून देत त्यांच्या सोबत ध्वज वंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचा अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम आलिमघर गावचे रहिवासी उत्तम राऊत यांनी केला आहे . त्याच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा तालुक्यातील सर्वच स्थरातून कौतुक करण्यात येत आहे.
             


 देशभर प्रजासत्ताक दिन दरवर्षी साजरा केला जातो मात्र आदिवासी वाड्यातील अनेक वीटभट्टी मजुरांची मुले शाळेत जात नसल्याने या मुलांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व व माहिती नसते त्यामुळे या मुलांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्व तसेच झेंडा वंदन याबाबत जनजागृती व माहिती व्हावी या उद्देशाने आपण अंजूर येथील आदिवासी वाड्यातील वीटभट्टीवर जाऊन याठिकाणी येथील मुलांसोबत ध्वज वंदन केल्याची माहिती उत्तम राऊत यांनी दिली आहे . यावेळी मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षक शंकर पाटील , संदीप पाटील , संतोष सुरवसे आदी उपस्थित होते .  
भिवंडीत आदिवासी पाडयात वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत केले ध्वज वंदन भिवंडीत आदिवासी पाडयात वीटभट्टी कामगारांच्या मुलांसोबत केले ध्वज वंदन Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads