Header AD

हिवाळ्यामध्ये ग्लिसरिन युक्त साबण वापरण्याचे मेडि मिक्सचे आवाहन


◆त्वचेमधील पेशींच्या रक्षणासह त्वचेमधील ओलावा राखण्यामध्ये करतो मदत...


मुंबई, १४ जानेवारी २०२१ : हिवाळ्यामध्ये बदललेल्या वातावरणीय घटकांमुळे आपली त्वचा सामान्यत: कोरडी व खरखरीत होते. सामान्य साबणाचा वापर केल्याने आपल्या त्वचा पेशींचा पोत अधिक खालावला जाऊ शकतो अशावेळी ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या साबणांऐवजी मेडिमिक्स आयुर्वेदिक नॅचरल ग्लिसरिन साबणाचा वापर करण्याचे आवाहन चोलायील प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कन्झ्युमर केअर ब्रॅण्डद्वारे करण्यात येत आहे. या उत्पादनामध्ये १०० टक्के नॅचरल ग्लिसरिन आणि नेचरचे मॉइश्चरायझिंग तज्ञ लक्षदी ऑइलची संयोजित क्षमता सामावलेली आहे. यामधून त्वचेमधील पेशींचे संरक्षण होण्याची आणि त्वचेमधून गेलेला ओलावा पुन्‍हा मिळण्याची खात्री मिळते. १०० ग्रामच्या पॅकमध्ये उपलब्ध या साबणाची किंमत ३५ रुपये आहे.


मेडिमिक्स साबणामध्ये लक्षदी ऑइल, कोरफड व ग्लिसरिनचे अद्वितीय संयोजन आहे, जे ओलावा कायम ठेवण्यामध्ये मदत करते आणि त्वचारंध्रे मोकळी करण्यासाठी त्वचेमधील तेलकटपणा दूर करते. तसेच हे संयोजन त्वचेला एक्स्फोलिएट व डिटॉक्सीफाय करते आणि सुरकुत्या येण्यापासून संरक्षण करते. हा बाजारपेठेत उपलब्ध असलेला एकमेव आयुर्वेद ग्लिसरिन विंटर सोप आहे.


चोलायील प्रा. लि.च्या विपणन विभागाचे प्रमुख आशिष ओहल्यान म्हणाले, 'ग्राहकाची विशिष्ट वर्तणूक आहे, ज्यामध्ये आम्हाला हिवाळ्यामध्ये त्यांच्या विद्यमान साबणांमधून मॉइश्चरायझिंग साबणांमध्ये बदल करण्याचा ट्रेण्ड दिसून आला आहे. आमचा या वर्तणूकीला जाणून घेत ग्राहकांना कोमल त्वचेसाठी १०० टक्के नैसर्गिक ग्लिसरिन साबण सादर करण्याचा मनसुबा आहे. यामुळे आम्‍हाला ग्लिसरिन विभागामध्ये आमची उपस्थिती दर्शवण्यामध्ये देखील मदत होईल. आम्हाला विश्वास आहे की, ग्राहकांना त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या कोमल ठेवण्यामध्ये प्रभावी असलेल्या नैसर्गिक ग्लिसरिन व लक्षदी तेलाचे महत्त्व समजेल."

हिवाळ्यामध्ये ग्लिसरिन युक्त साबण वापरण्याचे मेडि मिक्सचे आवाहन हिवाळ्यामध्ये ग्लिसरिन युक्त साबण वापरण्याचे मेडि मिक्सचे आवाहन Reviewed by News1 Marathi on January 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads