Header AD

स्वामी समर्थ मठाच्या वतीने मंलग गडावर वारी




कल्याण , प्रतिनिधी  : सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टकल्याण (पश्चिम) यांच्या वतीने  शुक्रवारी श्री मंलग गडावर वारीआरती व दर्शन क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी ७वा. शाकंभरी पौर्णिमा व आगमी नवरात्रचे औचित्य साधत मलंग गडावर भगाव्यामय वातावरणात स्वामी भक्तांच्या वारीची चढण्यास सुरुवात झाली. प्रथम गाडगेश्वर मंदिरात दर्शन आरती संपन्न झाली. 


पुढे मारुती दर्शना नंतर संतोषी माता मंदिरात दर्शन आरती संपन्न झाली. नवदुर्गाशिवमंदिर दर्शन आरतीकरुन दुसऱ्या समाधीला वस्त्र अर्पण करून मुख्य मंलग समाधीचे दर्शन आरती करून वारीची सांगता करीत मलंग गड उतरण्यास वारीतील भावकांनी सुरूवात केली. गुरूवर्य मोडक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त स्वामी भक्त मोठ्या संख्येने मलंग वारीत सहभागी झाले होते.

स्वामी समर्थ मठाच्या वतीने मंलग गडावर वारी स्वामी समर्थ मठाच्या वतीने मंलग गडावर वारी   Reviewed by News1 Marathi on January 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads