Header AD

सिलबंद केलेले रिक्षा स्टॅण्ड खुले करा अन्यथा रिक्षा चालकांचे आंदोलन

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस सिलबंद असलेले रिक्षा स्टॅण्ड विनाविलंब खुले करण्याची मागणी रिक्षा,टॅक्सी चालक मालक असोसिएशन रेल्वे प्रशासनाकडे केली असून रिक्षा स्टॅण्ड त्वरित खुला न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.


कोरोना लॉकडाऊन संचारबंदी काळात रेल्वेप्रशानाने २२ मार्च २०२० पासून स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्ड सिलबंद केले. शासनाने अॅनलॉक घोषित करुन आस्थपना, दुकाने, मार्केट, नागरी जिवनाशी निगडीत सर्व बाबी सुरु करण्याची परवागी दिलेली आहे. जनजिवन देखील सुरळीतरित्या सुरु झालेल आहे. तर राज्यातील अप डाऊन मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्या व अत्यावश्यक सेवा कर्मचारी व महीला प्रवासी लोकल ही सुरु झालेल्या आहेत. यामुळे नित्यरोज रेल्वे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे.


रिक्षा स्टॅण्ड बंद असल्याकारणाने स्टेशन समोर गर्दी व प्रंचड वाहतुककोंडी समस्या तक्रारी निर्माण होत आहे. यामुळे रिक्षा चालकांना नाहक वाहतुक पोलिस पोलिस प्रशासनाच्या कारवाईत रिक्षा वर दाडंके मारणे त्यात हुड लाईटरिक्षांचे नुसकान व  नकळत ईचलन मशीन व्दारे फोटो काढुन हजारो रुपये दंड भरावा लागुन आर्थिक भुर्दडं सोसावा लागतो. रिक्षा स्टॅण्ड बंद असल्याकारणाने प्रवाशी व महिला प्रवासी यांना रिक्षा प्रवास यासाठी असुविधा निर्माण होत आहे. रिक्षा स्टॅण्ड खुले करावे मागणी करुनही रेल्वे प्रशासन चालढकल करत आहे.


सात दिवसा पुर्वी रिक्षा स्टॅण्ड खुले करा असे निवेदन रिक्षा, टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात आलेले आहे.  त्वरित रिक्षा स्टॅण्ड खुले न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच रिक्षा बंद होऊन वाहतुक व रिक्षा सेवा प्रभावित झाल्यास संपुर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल असा इशारा रिक्षा, टॅक्सी चालक मालक असोसिएशनने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

सिलबंद केलेले रिक्षा स्टॅण्ड खुले करा अन्यथा रिक्षा चालकांचे आंदोलन सिलबंद केलेले रिक्षा स्टॅण्ड खुले करा अन्यथा रिक्षा चालकांचे आंदोलन Reviewed by News1 Marathi on January 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads