Header AD

इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे हे आहेत ५ फायदे
◆सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतूकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहने ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी व सभोवतालच्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे. येणा-या काळात वाहतूक हे एक मोठे शाश्वत आव्हान आहे. त्यामुळे निर्माते आणि आपल्यासारखे लोक इलेक्ट्रिक फ्लीट वाहनांकडे वळण घेत मोठी भूमिका बजावू शकतो. इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात याच्या विविध फायद्यांबद्दल.


देखभालीचा कमी खर्च: पेट्रोल किंवा डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत या वाहनांचा दैनंदिन रनिंग खर्च व मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो. सामान्य कारच्या तुलनेत ईव्हीचा मेंटेनन्स खर्च सुमारे ५०% कमी असतो. कारण ईव्ही इंटर्नल कंबस्शन इंजिन (आयसीई) वाहनांच्या तुलनेत अधिक विश्वसनीय आहेत. काही मेकॅनिकल पार्ट्स फेल होऊ शकतात आणि अधिक सक्रिय मेंटेनन्ससाठी नेहमीच चांगला डेटा प्रदान करते .


बदलता येणा-या बॅटरीचे तंत्रज्ञान: या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला चार्जिंग स्टेशनवर चार्ज केलेल्या बॅटरीच्या बदल्यात डिश्चार्ज बॅटरी बदलून घेता येते. हे तंत्रज्ञान अद्याप विकसित होत असून, या तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर अवलंबन होईल, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांना कार खरेदीदारांकडून प्राधान्य दिले जाईल. एमजी मोटर्स सारखे काही ब्रँड्स एमजी झेड झेडएस इव्हीसारख्या कारच्या माध्यमातून भविष्यातील तंत्रज्ञान आज देशात आणण्यासाठी काम करत आहेत.


ड्रायव्हिंगचा सहज अनुभव: आयसीई वाहनांच्या तुलनेत ब-याच ईव्ही आरामदायी व अधिक सहज ड्रायव्हिंगचा अनुभव प्रदान करतात. बॅटरीचे वजन वाहून नेण्यासाठी सस्पेंशन मजबूत असले पाहिजे. गोंगाट नसल्यामुळे चालवताना आरामदायक वाटते. इलेक्ट्रिक वाहनात केवळ एकच भूर्र असा सौम्य आवाज येतो. म्हणजेच केबिनमध्ये खूप कंफर्ट आहे. जाता जाता, रिजनरेटिव्ह ब्रेकिंगद्वारे एखादी व्यक्ती त्यांची कार चार्ज करू शकते.


शून्य उत्सर्जन: जगभरातील शहरे प्रदुषणाशी लढत असताना भारतही त्याला अपवाद नाही. सध्या जग हवामानविषयक आव्हानांना सामोरे जात असताना, भविष्यात अशी वेळ येईल की, देशातील काही भाग विशेषत: मोठ्या शहरांमध्ये शून्य उत्सर्जन झोन असतील. रस्त्यावर वाहताना इलेक्ट्रिक कार शून्य उत्सर्जन देतात. ईव्ही कोणतेही उत्सर्जन करत नाही, यामुळे कार्बन डायऑक्साइड तसेच इतर धोकादायक ग्रीनहाऊस वायू कमी होण्यास मदत होईल.


सर्वोच्च पुनर्विक्री मूल्य: ईव्हीची देखभाल करणे सोपे आहे. त्यांना ट्यूनअप करण्याची गरज नाही व नियमितपणे बदलता येण्यासारखे असे खूप कमी मूव्हेबल पार्ट्स आहेत. ईव्ही विशेषत: सौम्य ट्रान्समिशन पुरवतात, यात लोअर विअर व टीअर गोष्टी आहेत. उदा. स्पार्क प्लग्स, वॉल्व्ह्ज, मफलर/टेलपाइप, डिस्ट्रिब्युटर, स्टार्टर, क्लच, ड्राइव्ह बेल्ट्स, हॉसेस,व कॅटालेटिक कन्व्हर्टर इत्यादी. पण सामान्यपणे आयसीई वाहनात ही सुविधा नसते. ग्रीन मोबिलिटीच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ईव्ही अधिक आकर्षक ठरत आहेत. परिणामी, त्यांना उत्तम पुनर्विक्री मूल्यही आहे. एमजीसारख्या काही कंपन्या बायबॅक अनुभवदेखील प्रदान करतात.

इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे हे आहेत ५ फायदे इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे हे आहेत ५ फायदे Reviewed by News1 Marathi on January 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads