Header AD

कल्याण-डोंबिवलीतील १४ आरोग्य केंद्र कोरोना लसीसाठी सज्ज

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना लसी  संदर्भात मनपा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. भारतात  कोरोना लसीला मान्यता मिळाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील लस जय्यत तयारी केली जात आहे.   यासाठी कल्याण डोंबिवली येथील १४ आरोग्य केंद्र लस देण्यासाठी सज्ज केली गेली आहे. 


विशेष म्हणजे मंगळवारी या संदर्भात आरोग्य अधिकारी आणि सेवकांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भारतातील सिरम या कंपनीच्या लसिला मान्यता देण्यात आली. ही लस कुठे आणि कशी द्यायची कल्याण डोंबिवली पालिकेत मात्र १४ आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. प्रथम आरोग्य सेवक, जनसंपर्क असणारे सरकारी अधिकारी , पोलीस,  वयोवृद्ध आणि मधुमेह बीपी असणारे रुग्ण आणि त्यानंतर सर्व सामन्यांना ही लस देण्यात येईल अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी संदीप निंबाळकर यांनी दिली. या संदर्भात प्रशासन सज्ज असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सांगितले.
कल्याण-डोंबिवलीतील १४ आरोग्य केंद्र कोरोना लसीसाठी सज्ज कल्याण-डोंबिवलीतील १४  आरोग्य केंद्र कोरोना लसीसाठी सज्ज Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads