Header AD

खडकपाडा पोलिसांनी महिलांना दिले आत्मसुरक्षेचे धडे

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दैनंदिन जीवनात वावरताना महिलांनी स्वताची सुरक्षा कशी करावी याबाबत कल्याण मधील खडकपाडा पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत असून पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध सोसायट्यांमध्ये जाऊन महिलांना आत्मसुरक्षेचे आणि सायबर गुन्हे कसे रोखता येतील याबाबत धडे दिले जात आहेत.


       पिडीसी इव्हेंट आणि ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यावतीने महिलांच्या सुरक्षितते करिता व सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने योगीधाम गुरुआत्मन सोसायटी येथे महत्वपूर्ण मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सायबर सुरक्षिततेबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले. तर निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षे संदर्भात आत्मसरंक्षण करण्यासाठी प्रात्यक्षिके करून दाखविले.


       कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करतांना बँकेचे डीटेल्स, ओटीपी कोणालाही देऊ नये. तसेच आपली व कुटुंबाची इतर वैयक्तिक माहिती सोशल मिडीयावर शेअर करू नये याबाबत पोलीस डेव्हलपमेंट कॅम्पच्या मुख्य प्रवर्तक शिल्पा डागा यांनी मार्गदर्शन केले असल्याची माहिती व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली. अशाचप्रकारचे मार्गदर्शन शिबीर पोलीस स्टेशन हद्दीत इतर ठिकाणी देखील राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नगरसेवक दया गायकवाड हे देखील उपस्थित होते.      
खडकपाडा पोलिसांनी महिलांना दिले आत्मसुरक्षेचे धडे खडकपाडा पोलिसांनी महिलांना दिले आत्मसुरक्षेचे धडे Reviewed by News1 Marathi on January 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads