महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी च्या २ च्या २० जागा होतील मेहबूब शेख
◆राष्ट्रवादीच्या युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याला केले मार्गदर्शन नागपूरची जागा जाणं हे भाजपाचे नाक कापल्यासारखे आहे...
कल्याण, कुणाल म्हात्रे : सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे फक्त २ नगरसेवक असून आगामी निवडणुकीत हि संख्या २० होणार आहे. तर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाची नागपूरची जागा जाणं हे भाजपाचं नाक कापल्या सारखं असल्याची टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ३६ बैल बाजार येथे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे यांच्यावतीने बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा, युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी युवक मेळावा आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित केलेल्या युवक मेळाव्यात मेहबूब शेख बोलत होते.
यावेळी मेहबूब शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतना सांगितले कि, लोकप्रतिनिधी हा केवळ वॉटर मीटर गटार साठी निवडून न देता त्याने आपल्या मुलांच्या हाताला काम दिलं पाहिजे. राजकारणात युवकांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात सर्वात युवा पक्ष राष्ट्रवादी असून यामध्ये ५४ पैकी ४० आमदार युवक आहेत. आपल्याकडे सत्ता जरी असली तरी कोणावर अन्याय करता कामा नये मात्र कोणी जर आपल्या अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतलं पाहिजे. विरोध पक्ष नेहमी बदनामीच काम करत आहेत.
कल्याण डोंबिवली मधील कोणतेही प्रश्न असो ते सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देऊ. लोकांच्या समस्या या आपल्या कार्यालयातून सुटल्या पाहिजे. साताऱ्याच्या शरद पवार यांच्या सभेचे अनुकरण बायडन यांनी अमेरिकेत केलं ट्रम्प पावसाला घाबरून घरी बसले आणि घरीच बसले. झारखंड मधल्या मुख्यमंत्र्यांना जर शरद पवार यांच्याकडून ताकद मिळत असेल तर आपल्या युवकांना किती ताकद मिळायला पाहिजे याचा विचार करा असे आवाहन देखील मेहबूब शेख यांनी केले. तर कल्याण डोंबिवली मध्ये चांगलं काम करणाऱ्या युवकांना आगामी काळात उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करणार असून महाविकास आघाडी बाबत पक्षाचे नेते लवकरच निर्णय घेतील असेही सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक घोडके, सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस गौतम रोकडे, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन, जिल्हा सरचिटणीस प्रशांत नगरकर, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष योगेश माळी, श्याम आवारे, प्रशांत माळी, अजया आवारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment