Header AD

कल्याण डोंबिवलीत ९८ नवे रुग्ण आजही एकही मृत्यू नाही

 

◆५८,६७१ एकूण रुग्ण तर १११८ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ७१  रुग्णांना डिस्चार्ज..



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ९८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज सलग दुसऱ्यादिवशी  कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. गेल्या २४ तासांत ७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


       आजच्या या ९८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,६७१ झाली आहे. यामध्ये १०५३ रुग्ण उपचार घेत असून ५,५०० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८कल्याण प -२७, डोंबिवली पूर्व २३डोंबिवली प – २०मांडा टिटवाळा -८ तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 


         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकुल येथून,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तसेच १५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ९८ नवे रुग्ण आजही एकही मृत्यू नाही कल्याण डोंबिवलीत ९८ नवे रुग्ण आजही एकही मृत्यू नाही  Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads