Header AD

कल्याण पूर्वेतील विविध समस्यांबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेटया


◆मनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकासही होईल आणि चांगली कामेही होतील आंमदार गणपत गायकवाड...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील विविध समस्यांबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी मनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकासही होईल आणि चांगली कामेही होतील असे मत कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना आमदार गायकवाड यांनी हे मत व्यक्त केले.


कल्याण पूर्वेमध्ये असणाऱ्या कचरापाणी पुरवठापुना लिंक रोडवरील सतत तुटणारी झाकणंगार्डनची व्यवस्थित न होणारी देखभाल दुरुस्तीस्ट्रीट लाईट अशा विविध समस्यांबाबत आपली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा झाल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर १०० फूट रस्त्यावरील माधव अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतही यावेळी चर्चा झाली. ही इमारत तोडल्यावर १०० फूटी रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले.


दरम्यान कल्याण पूर्वेत रेल्वे परिसर असणाऱ्या ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू असून उर्वरित भाग ताब्यात आल्यावर त्याठिकाणीदेखील विकासकामे सुरू होतील असा विश्वासही आमदार गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केडीएमसीचा पदभार घेतला आणि पाठोपाठ कोरोनाची समस्या आली. त्यामुळे एवढे महिने नागरी समस्यांबाबत त्यांच्याशी नीट चर्चा करता आली नाही म्हणून आपण आज त्यांची भेट घेतल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केले.

कल्याण पूर्वेतील विविध समस्यांबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेटया कल्याण पूर्वेतील विविध समस्यांबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेटया Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads