Header AD

केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची रक्ततुला

 

◆धुळे जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन संकलित केले ३५७ युनिट रक्त....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ऑल इंडिया केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार, तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची रक्ततुला करण्यात आली. धुळे जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील ४ तालुक्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये ३५७ युनिट रक्त संकलित करण्यात आले.   

जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी धुळे जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने अन्नवाटप, वस्त्र वाटप, गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूरसाक्रीशिंदखेडा या ४ तालुक्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला मेडिकल व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद देत तब्बल ३५७ युनिट रक्त संकलित केले.


जगन्नाथ शिंदे यांनी केमिस्ट बांधवांसाठी आपल्या रक्ताचे पाणी करून काम केले असल्याने त्यांचे ऋण फेडण्यासाठी हे रक्तदान शिबीर राबवून त्यांच्या निवासस्थानी या संकलित केलेल्या रक्ताच्या माध्यमातून रक्ततुला करत एक अनोखा उपक्रम राबविला असल्याची माहिती धुळे जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश भगत यांनी दिली. दरम्यान जगन्नाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मेडिकल क्षेत्र, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वानीच गर्दी केली होती. 

केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची रक्ततुला केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची रक्ततुला  Reviewed by News1 Marathi on January 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads