Header AD

अपघात हि महामारी असेल तर त्यावर उपाययोजना कराव्यात रस्ता सुरक्षा अभियानात माजी नगरसेवक मंदार हळबे यांची सूचना ..
डोंबिवली , शंकर जाधव  :  २०१९-२० या वर्षात कोरोना महामारीने सुमारे १ लाख पेक्षा जास्त लोक मरण पावले मात्र त्यापेक्षा जास्त दरवर्षी जगभरात अपघाती मृत्यू होत असतात.त्यामुळे अपघात हि  महामारी असेल तर त्यावर उपाययोजना कराव्यात अशी सूचना प्रशासनाला मनसेचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी डोंबिवलीत रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केली. डोंबिवली वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाच्या वतीने ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    

वाहतूक नियत्रण विभाग, ठाणे शहर वाहतूक उपविभाग डोंबिवलीच्या वतीने मंगळवारी रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात पालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे,रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोई,वाहतूक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे,मनसेचे माजी नगरसेवक मंदार हळबे,सुदेश चूडनाईक,`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत,`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी स्नेहा करपे,प्रसिद्ध कलाकार सतीश नायकोडी आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पोलीस मित्र जितेंद्र अमोणकर, श्रीधर सुर्वे, महेश काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थित रहावी म्हणून वाहतूक पोलीस,स्थानिक पोलीस,पोलीस मित्र आणि जागरूक नागरिक हे काम करतात.मात्र शहतील वाहतूक कोंडीला काही बेशिस्त रिक्षाचालक जबाबदार आहेत.तर पालिकेचे उपायुक्त जगताप म्हणाले,वाहतूकिला अडथळा आणणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाई,फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली असून रस्ते रुंदीकरण करण्यात आले आहे.पुढे माजी नगरसेवक मंदार हळबे म्हणाले,कोरोना काळात अनेकांना जीव गमवावे लागले.त्यापेक्षा जास्त मृत्यू अपघातात होतात. 


त्यामुळे अपघात हि महामारी असले तर त्यावर योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.नागरिकांनी यासाठी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.प्रसिद्ध कलाकार सतीश नायकोडी म्हणाले, मी जर क्राईम पेट्रोल मध्ये पोलिसाची भूमिका करत असलो तर उन्हाळा, पावसाला आणी हिवाळ्यात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना सलाम करतो.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन करताना समाजसेविका सुप्रिया कुलकर्णी यांनी कोरोना योद्धा असलेल्या पोलिसांवर केलेल्या कविता वाचून दाखवली. तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी वाहतूक पोलीस नाईक अशोक खैरनार यांनी सांभाळली.


अपघात हि महामारी असेल तर त्यावर उपाययोजना कराव्यात रस्ता सुरक्षा अभियानात माजी नगरसेवक मंदार हळबे यांची सूचना .. अपघात हि महामारी असेल तर त्यावर उपाययोजना कराव्यात रस्ता सुरक्षा अभियानात माजी नगरसेवक मंदार हळबे यांची सूचना .. Reviewed by News1 Marathi on January 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads