वीजवितरण कंपनीने रस्त्यात केबल टाकण्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे मनसेचे निर्देश
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी संत नामदेव पथ येथील वीजवितरण कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरु आहे.या कामामुळे रस्त्यावर मातीचे डोंगर,डांबरी रस्त्याचे मोठे तुकडे, माती व धुळीमुळे नागरीकांना त्रास होत होता.या खोदकामात रस्त्यावर खड्डे पडल्याने या खड्ड्यात शैला भोसले या महिला पडून जखमी झाल्या होत्या. याची माहिती माजी नगसेवक मनोज घरत यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मनसे आमदार प्रमोद ( राजु) पाटील यांच्या सुचनेनुसार घरत यांनी पालिकेचे अभियंता राजपुत, वीजवितरण कंपनीने अभियंता गायकवाड व ठेकेदार यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले.या ठिकाणचे सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश घरत यांनी दिले.त्यानुसार सदर काम पुढच्या आठवड्यात सुरु करुन डांबरीकरण करुन देण्यात येईल असे यावेळी राजपुत यांनी सांगीतले.

Post a Comment