Header AD

राष्ट्रवादी सोडून गेलेले नगरसेवक पुन्हा पक्षात येणार ? कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी`पुन्हा`

 डोंबिवली , शंकर जाधव  :  कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हा युतीचा बालेकिल्ला असल्याचे जरी बोलले जात असले तरी याच महापालिकेत ११ नोंव्हेबर २००५ ते ११ मे २००८ या अडीच वर्षात राष्ट्रवादीने सत्ता उपभोगली होती.राष्ट्रवादीचे पुंडलिक म्हात्रे हे महापौर तर उपमहापौर पदी कॉंग्रेसचे पंडित भोईर हे विराजमान होते.त्यानंतर शिवसेना-भाजप युतीने आपली सत्ता कायम ठेवण्यास यश मिळवले.२०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढली तर कॉंग्रेस –राष्ट्रवादीने आघाडी करून जोरदार प्रयत्न केले. यात राष्ट्रवादीला दोन तर कॉंग्रेसला चार जागांवर विजय मिळवता आला. शिवसेना-भाजपने निवडणुकीनंतर युती करून सत्ता स्थापन केली.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातरा येथे भरपावसात जाहीर सभा घेतल्याने  विधान सभेत राष्ट्रवादीचे ४३ आमदार निवडणून आले.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने पुरेसे लक्ष दिले नसल्याने राष्ट्रवादीला यश आले नाही. यावेळी आगामी २०२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा आपली सत्ता आणण्यासाठी आपले उद्दिष्ट` राष्ट्रवादी सोडून गेलेले नगरसेवक पुन्हा पक्षात` असा विचार केला आहे. याबाबत कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेले नगरसेवक व कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे डोंबिवलीत रक्तदान शिबिराच्यावेळी सांगितले.


राज्यात रक्तपेढीची तुडवडा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील नव-डोंबिवली को.हॉ.सो.लि. येथे रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे,कल्याण-डोंबिवली कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील, माजी कार्याध्यक्ष तथा आयोजक राजेंद्र नांदोस्कर, डॉक्टर सेलचे जिल्हाअध्यक्ष अनिल पाटील, माजी नंदू धुळे ( मालवणकर ),माजी नगरसेवक प्रकाश तरे, समीर भोईर,जगधिश ठाकूर, समीर गुधाटे, निरंजन भोसले सुरेश जोशी, पांडुरंग चव्हाण, मिलिंद भालेराव,युवराज पवार,विनया पाटील,मानली पाटील,नीला पाटील,संगीता मोरे,मधुकर शेळके आदि उपस्थित होते.यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. 


तर अनेकांनी रक्तदान केले. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेहमीच जनतेचे हितासाठी काम करत असते निवडणुका जवळ आली कि जनेतला दाखवण्यासाठी कामे करत नाही.आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दिसेल.राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांना पुन्हा घरवापसीसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.तर माजी कार्याध्यक्ष तथा आयोजक राजेंद्र नांदोस्कर यांनी पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा सुरु असल्याचे सांगितले.माजी प्रकाश तरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत आहेत.

राष्ट्रवादी सोडून गेलेले नगरसेवक पुन्हा पक्षात येणार ? कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी`पुन्हा` राष्ट्रवादी सोडून गेलेले नगरसेवक पुन्हा पक्षात येणार ?  कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी`पुन्हा` Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads