डोंबिवलीत लसीकरणाच्या ड्राय रनात कोणतीही त्रुटी नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीचा निष्कर्ष
डोंबिवली, शंकर जाधव : लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून डोंबिवलीत येथे ड्राय रन झाले.लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रतीक्षा कक्ष,नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लसीकरण झाल्यावर आज्बर्वेशन कक्षहि निर्माण करण्यात आला आहे. या ड्राय रनसाठी डोंबिवली पूर्वेकडील पाटकर नागरी आरोग्य केंद्रात पाच जागतिक आरोग्य आरोग्य केंद्राचे डॉ.किशोर चव्हाण, पालिका अधिकारी आणि आरोग्य कर्ममारी उपस्थित होते. या पाहणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे ( डब्लूएचओच्या )चा आढाव्यात ड्राय रनात कोणतीही त्रुटी नसल्याचा निष्कर्ष समोर आला.
डोंबिवली पूर्वेकडील पाटकर नागरि आरोग्य केंद्रात शुक्रवारी घेण्यात आलेल्या लसीकरणाच्या ड्राय रनाच्या वेळी पालिका उपायुक्त सुधाकर जगताप, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील व डॉ.सुहासिनी बडेकर,परिचारिका इन्चार्ज माया खोत, `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांसह अधिकारी वर्ग उपस्थित होते.यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.किशोर चव्हाण यांनी लसीकरणाच्या ड्राय रनाचा पाहणी दरम्यान आढावा घेतला.या आढाव्यात त्यांना कोणतीही त्रुटी आढळली नसून त्याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाचे कामाबाबत समाधान व्यक्त केले. तर साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी सुरुवातीला ज्या लाभार्थ्याला लस देण्यासाठी पालिकेने मेसेज पाठविला आहे त्याची तपासणी केली जाईल. लाभार्थ्याचे पॅनकार्ड किंवा आधारकार्ड तपासले जाईल.
जेणेकरून त्याची ओळख पटावी असे पॅनकार्ड किंवा आधारकार्ड नंबर आणि प्रशासनाकडे त्या लाभार्थ्याची असलेली माहिती अशी योग्य माहितीची पटल्यानंतर सुरक्षित अंतर, तोंडावर मास्क आणि सेनेटराईज करून त्या लाभार्थ्याला लसीकरणासाठी केंद्रात पाठवले जाते.त्यापुढे लाभार्थ्याला लस दिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होतात कि नाही यासाठी त्या लाभार्थ्याला पाहणी कक्षात बसवले जाते. तसेच एखाद्या लाभार्थ्याला लसीचा दुष्परिणाम झाल्यास त्याच्या उपचारासाठी किट्स ठेवले जातील.अगदी लाभार्थ्याला जास्त त्रास झाला तर त्याला कोविड रुग्णालयात दाखले केले जाते. अश्या प्रकारे प्रत्यक्ष लस देण्यात येणार असल्याचे डॉ.पानपाटील यावेळी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

Post a Comment