Header AD

नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांना सन्मान

 भिवंडी , प्रतिनिधी  : गोदाम पट्टा येत असलेल्या नारपोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांच्या सेवाकार्याची दाखल घेत वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात घेटे यांचा सन्मान केला.  नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या पट्यात गोदाम भाग जास्त असल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते हि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी घेटे यांनी विशेष मोहीम राबवत याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी केली असून २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात ड्रंक अँड ड्राइव्ह च्या सर्वाधिक केसेस देखील नारपोलीस विभागाने केली असून वर्षभरात सर्वाधिक दंड वसुली केल्याने त्यांच्या या कामाची दाखल वाहतूक विभागाने घेतली असून शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सन्मानपत्र देऊन घेटे यांना गौरविले.                
नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांना सन्मान नारपोली वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांना सन्मान Reviewed by News1 Marathi on January 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

अखेर कल्याण मध्येही बर्ड फ्ल्यूची एन्ट्री अटाळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्येही  ' बर्ड फ्ल्यू ' ची एन्ट्री झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्या...

Post AD

home ads