Header AD

वाहतूक सुरक्षा सप्ताह ही समाजाची चळवळ झाली पाहिजे..वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील
भिवंडी  , प्रतिनिधी  :   वाहतूक सप्ताह साजरे करणे ही समाजातील नागरीकांची चळवळ झाली पाहिजे असे वक्तव्य ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे .ते भिवंडी येथील नारपोली वाहतूक शाखे तर्फे आयोजित सडक सुरक्षा जीवन रक्षा मासिक सप्ताह या कार्यक्रमाच्या उदघाटनात प्रसंगी बोलत होते .या वेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय शिंदे ,नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो निरी मालोजी शिंदे ,वाहतूक शाखेतील वरिष्ठ पो निरी रवींद्र मायने ,अशोक थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वाहतूक सप्ताह निमित्त संपूर्ण महिनाभर जनजागृती करून शून्य अपघात मोहीम राबविली जाणार असल्याचे स्पष्ट करीत ,२०१९ या वर्षभरात देशात रस्ते अपघातात १ लाख ५२ हजार जणांचा जीव गेला आहे तर ४ लाख ३७ हजार जणांचे एक अवयव निकामी होऊन जायबंदी होण्याची वेळ अपघातांमुळे आली आहे.कोरोना थांबविण्यासाठी सगळे लढतात मग वाहतूक नियम पाळण्यासाठी आपल्या सर्वांची  जबाबदारी नाही का असा प्रश्न उपस्थित करीत अपघात माझं तुझं करत नाही , अपघात हा अपघाताचा असतो याची जाणीव आपल्याला होत नाही तो पर्यंत सुधारणा होणार नाही ,कुटुंबातला असला तरच मदत करायची ही भावना सोडून द्या वेळेवर मदत मिळाली तर अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन बाळासाहेब पाटील यांनी केले .वाहतूक पोलिस नियोजन करतात परंतु त्यांची अंमलबजावणी वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ,शासकीय संस्था यांच्या कडे असल्याने होत नाही असे सांगत वाहन वाढली ,रस्ते तेवढेच राहिले परंतु वाहतूक पोलीस संख्येत दहा वर्षात वाढ झालीच नाही तर मग नियोजन होणार कसे वर्षे तेवढेच मग असे दुःख मांडत ,वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढण्यास आपणच जबाबदार आहोत सोयीस्कर नियमांचा आपण लगेच स्वीकार करतो त्रासदायक असलेले नियम टाळतो हे बंद केले पाहिजे वाहतूक नियम हे जीवन वाचविण्यासाठी आहेत याची जाणीव प्रत्युएकाने ठेवावी असे शेवटी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
          

वाहतूक शाखे तर्फे या पूर्वी आठवडा भर सप्ताह साजरा केला जात होता परंतु केंद्र सरकार कडून या बाबत महिनाभर जनजागृती करून सप्ताह साजरा करण्याच्या सुचने नुसार संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पो निरी कल्याणजी घेटे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात केले तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने रिक्षा चालक ,वाहतूक व्यावसायिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपायुक्तांच्या हस्ते रिक्षांवर वाहतूक जनजागृतीचे स्टिकर चिटकविण्यात आले
वाहतूक सुरक्षा सप्ताह ही समाजाची चळवळ झाली पाहिजे..वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील वाहतूक सुरक्षा सप्ताह ही समाजाची चळवळ झाली पाहिजे..वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील Reviewed by News1 Marathi on January 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads