दुर्मिळ मांडूळ सापाला जीवनदान
कल्याण , कुणाल म्हात्रे : दुर्मिळ मांडूळ जातीचा साप कल्याण पूर्वेतील अग्निशमन दलाच्या कार्यलयात एका व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास येथील फायर अधिकाऱ्यांच्या हवाली केला. या दुर्मिळ मांडूळ सापाला कल्याण वन विभागाचे वनपाल अधीकारी यांच्या उपस्थित आज सर्पमित्राने निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.
कल्याण पूर्वेत कल्याण डोंबिवली महापालिकेचे 'ड' प्रभाग कार्यलयात आहे. तर याच कार्यलयालगत अग्निशमन दलाचे फायर स्टेशन असून या अग्निशमन दलात कार्यरत असलेले सरोदे हे कर्त्यव्यावर हजर असताना काल मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक एका व्यक्तीने दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आणून दिला. त्यांनतर या मांडूळ सापाची माहिती सर्पमित्र दत्त बोबे यांना सरोदे यांनी संपर्क करून दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे हे अग्निशमन कार्यलयात जाऊन त्यांनी मांडूळ साप ताब्यात घेऊन कल्याण विभागाचे वनपाल एम. डी. जाधव यांच्या निगराणी खाली सकाळपर्यत ठेवण्यात आला होता.
मांडुळ जातीच्या सापांच्या अंगातील द्रव्य औषधासाठी उपयोगी पडत असल्याने औषध कंपन्यांकडून हे द्रव्य काढल्यानंतर त्याच्यापासून औषधे बाजारात विकली जाते. तसेच मांडूळ जातीच्या सापाची काळ्या जादूच्या नावाखालीही तस्करी केली जाते. जेवढा मोठा मांडूळ तेवढी लाखोंची रक्कम तस्कर ठरवीत असल्याचे पोलिसांनी अनेक वेळा पकडलेल्या तस्करांकडून उघडकीस आणले आहे. हा मांडूळ साप साडेचार फुट लांबीचा असून याही सापाची कोण्या अज्ञात व्यक्तीने विक्रीसाठी आणला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलिसांच्या भीतीने हा साप अग्निशमन दलाच्या कार्यालयात जमा केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Post a Comment