केडीएससीच्या बीएसयूपी इमारतींमध्ये चोरीचे प्रकार आयुक्तांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी बीएसयूपी प्रकल्पांतर्गत घरे तयार करण्यात आलेली आहेत. कल्याण पूर्वेतील कचोरे नजीकच्या नवी गोविंदवाडी परिसरात बीएसयूपी इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. या इमारतीपैकी काही इमारतीत नागरीक राहत असून काही इमारती रिकाम्या आहेत. याचाच फायदा घेत काही चोरटय़ांनी इमारतीतील खिडक्या, नळ, दवावाजे चोरी करीत आहे.
आत्तार्पयत लाखोंच्या वस्तू चोरीला गेल्या असून स्थानिक नागरीकांनी या चोरीच्या घटनेचा व्हीडीओ काढून केडीएमसी अधिका:याना दिला आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान या चोरीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत असून याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका तथा भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी यांनी दिली.

Post a Comment