Header AD

वायरल व्हीडीओ मुळे भाजप शिवसेनेत जुंपली निवडणूकीच्या तोंडावर राजकारण तापले


◆चुकीचा मार्ग अवलंबून शिवसेना निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवकाचा गंभीर आरोप...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  सोशल मिडीयावर वायरल झालेल्या व्हिडीओमुळे कल्याणमध्ये भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले असून त्याचाच प्रत्यय समोर आला आहे. चुकीच्या मार्गाने निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजप नगरसेवक विक्रम तरे यांनी केला आहे तर शिवसेनेकडून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०२० ला संपुष्टात आला आहे. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. इतकेच नाही तर काही तरी मुद्यावर पक्षांमध्ये वादविवादआरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. दोन दिवसापूर्वी एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत महापालिकेचे काही कर्मचारी आणि व्यापारी यांच्या वाद होताना दिसत आहे. या व्हीडीओच्या खाली भाजप नगरसेवक विक्रम तरे यांच्यावर भ्रष्टाचारा आरोप केला गेला होता. या व्हीडीओमुळे शिवसेना भाजपमध्ये जुंपली आहे.


 केडीएमसीचे भाजप नगरसेवक विक्रम तरे यांचा आरोप आहे कीएक व्हीडीओ एडिट केला आहे. त्यात ब्लॅकमेलिंग व भ्रष्टाचारा आरोप होत आहे. यामध्ये केडीएमसीचे कर्मचारी आणि शिवसेना युवा सेना पदाधिकारी मधुर म्हात्रे सहभागी आहेत. शिवसेना चुकीच्या मार्गाने निवडणूक जिंगण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता माझ्या पाठीशी आहे. या प्रकरणात विक्रम तरे यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून व्हीडीओ टाकून बदनामी केल्याबद्दल मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


तर या प्रकरणी व्हीडीओ टाकणारा शिवसेना युवा पदाधिकारी मधूर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काही बोलण्यास नकार दिला आहे.

वायरल व्हीडीओ मुळे भाजप शिवसेनेत जुंपली निवडणूकीच्या तोंडावर राजकारण तापले वायरल व्हीडीओ मुळे भाजप शिवसेनेत जुंपली निवडणूकीच्या तोंडावर राजकारण तापले Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads