Header AD

३१जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंडामध्ये १०० टक्के सूट मिळवा

 

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर निवासी मालमत्तांसाठी ठाणे महानगरपालिकेचा निर्णय....


ठाणे , प्रतिनिधि  :  कोविडच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक थकीत करांसह आपला संपूर्ण मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरतील त्यांना शास्तीमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाण्याचे प्रपथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.

 

कोविड १९ चा संसर्ग सुरू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सर्वत्र लॅाकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले होते. सदरची परिस्थिती लक्षात घेवून मालमत्ता करावर कलम ४१(१) अन्वये आकारलेली शास्ती(व्याज) मध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आला. सदरची योजना केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी लागू आहे.


या निर्णयानुसार जे मालमत्ता धारक आपला मालमत्ता कर (संपूर्ण थकबाकीसह) ३१ जानेवारीपर्यंत एक रकमी भरतील त्यांना दंडामध्ये संपूर्ण सवलत देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांना आपला मालमत्ता कर ॲानलाईन पद्धतीने www.propertytax.thanecity.gov.in या वेब लिंकवर तसेच www.digithane.thanecity.gov.in या डीजी ठाणे ॲपच्या माध्यमातून आपला मालमत्ता कर भरता येईल. 


त्याचप्रमाणे महापालिकेच्या संकलन केंद्रावरही रोख, धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट, डेबिट कार्डच्या माध्यमातूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. महापालिकेची संकलन केंद्रे सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर सार्वजनिक सुट्टी आणि सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत.

३१जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंडामध्ये १०० टक्के सूट मिळवा ३१जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंडामध्ये १०० टक्के सूट मिळवा Reviewed by News1 Marathi on January 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads