Header AD

शारीरीक शिक्षण शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार निरंजन डावखरे यांचे आश्वासन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने शारीरिक शिक्षण व शिक्षक प्रमुख   प्रश्नांसंबधी निवेदन अंतर्गत संदीप मनोरे आणि तायाप्पा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. मुंबई विद्यापीठ शारीरीक शिक्षण संचालक पद आणि शालेय स्तरावर शाळा तेथे शारीरीक शिक्षण शिक्षक असावाक्रीडा धोरण २०१२ संचमान्यता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शारीरीक शिक्षण विषयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासंबंधी चर्चा करून निवेदन देण्यात आले.


 कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शारीरीक शिक्षण विषय आणि शारीरीक शिक्षण शिक्षक यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत लवकरच सहविचार सभेचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.


       यावेळी मुंबई विभाग युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव प्रदीप मस्तूद, ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव डॉ. सुनिल पवारकार्याध्यक्ष अमोलकुमार वाघमारेनवी मुंबई युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष जितेंद्र म्हात्रेमुंबई विभाग संपर्क प्रमुख भालचंद्र सावर्डेकरमुंबई विभाग सदस्य शरद मगर, स्वप्निल शेट्टी संतोष मुंढेखजिनदार वाल्मीक नाईकभिवंडी तालुका युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सचिव छत्रपती घोटकर, सदस्य भावेश गुळवी आदीजण उपस्थित होते.

शारीरीक शिक्षण शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार निरंजन डावखरे यांचे आश्वासन शारीरीक शिक्षण शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार निरंजन डावखरे यांचे आश्वासन Reviewed by News1 Marathi on January 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads