Header AD

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने दुचाकी ढकलत रस्त्यावर मांडला ठिय्या





कल्याण ,कुणाल  म्हात्रे  :  इंधन दरवाढी विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याण पूर्वेतील टाटा पॉवर हाउस येथे कल्याण शिळ रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी जवळील तलाठी कार्यालयापर्यंत दुचाकी ढकलत नेत संबंधित तलाठी यांना निवेदन दिले.


मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोलडिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्रभाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना 'अच्छे दिनपहावयास मिळाले नाहीत. वाढत्या इंधन दरांमुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे तसेच महागाईसुद्धा वाढत आहे. पेट्रोलडिझेलगॅस सिलिंडर सगळ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. या सर्वांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली असल्याचे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी सांगतिले.


       यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, प्रशांत नगरकर, श्याम आवारे, प्रशांत माळी, योगेश माळी, स्वप्नील रोकडे, मीनाक्षी आहेर, अजया आवारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने दुचाकी ढकलत रस्त्यावर मांडला ठिय्या इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने दुचाकी ढकलत रस्त्यावर मांडला ठिय्या  Reviewed by News1 Marathi on January 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads