Header AD

पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात लिफ्ट बंद, रुग्णांचे हाल

 डोंबिवली , शंकर जाधव  : येथील पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयात गुरुवारी सकाळी लिफ्ट बंद झाल्याने रुग्णांचे हाल झाले.रुग्णालयात पहिल्या व दुसर्या मजल्या जाण्यासाठी मजले चढून जावे लागत असल्याने रुग्णांना त्रास होत आहे रुग्णांना त्यांचे नातेवाईक आधार देत होते.हा प्रकार डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी वर्ग पाहत असून त्यांनी यावर काहीही मदत केली नसल्याने रुग्ण नाराज झाले होते.


डोंबिवलीतील प्रसिद्ध निवेदक शिवा गायकवाड यांच्या आईला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.पायाला लागले असल्याने गायकवाड यांनी आपल्या आईला लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर नेण्याचे ठरविले. परंतु लिफ्ट बंद असल्याचे पाहून गायकवाड यांना राग आला. त्यानी आईला आधार देत दुसऱ्या मजल्यावर नेले.याबाबत गायकवाड यांनी रूग्णालय व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली.तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या,सकाळपासून लिफ्ट बंद असून लिफ्टचे पार्ट अजूनही मिळाले नाहीत.

पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात लिफ्ट बंद, रुग्णांचे हाल पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात लिफ्ट बंद, रुग्णांचे हाल Reviewed by News1 Marathi on January 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads