Header AD

भिवंडीतील काल्हेर मध्ये भर दिवसा महिलेवर घरात घुसून गोळीबार

 



भिवंडी ,  प्रतिनिधी  :  काल्हेर येथे शिवसेनेच्या शाखा प्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांनाच एका महिलेच्या घरात घुसून महिलेवर गोळीबार झाल्याची दुसरी घटना काल्हेर येथील एका निवासी सोसायटी मध्ये मंगळवारी घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. 
           

जयश्री देढे ( वय ३७ ) असे जखमी महिलेचे नाव असून काल्हेर मधील जय दुर्गा सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत. सदर महिलेच्या पतीचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून जखमी महिला देखील ट्रान्सपोर्ट व्यावसाय सांभाळत आहे. मंगळवारी सकाळी साडे दहा च्या सुमारास पती कामानिमित्त तर मुलगा मित्रांकडे गेले असता महिला घरात एकटीच होती. यावेळी दोन अज्ञात इसम रिक्षाने आले व त्यांनी घरात घुसून महिलेशी वाद विवाद करत या महिलेवर गोळीबार केला. 


या गोळीबारात महिला गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल्हेर मधील गोळीबाराची ही दुसरी घटना असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या गोळीबारा मागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराने परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. 
भिवंडीतील काल्हेर मध्ये भर दिवसा महिलेवर घरात घुसून गोळीबार भिवंडीतील काल्हेर मध्ये भर दिवसा महिलेवर घरात घुसून गोळीबार Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads