भिवंडी , प्रतिनिधी : महाराष्ट्रात समाज कल्याण विभागांतर्गत २३८८ अनुदानित वसतिगृह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरु असून या वसतिगृहात राज्यभर सुमारे ८१०४ कर्मचारी पूर्णवेळ काम करीत आहेत परंतु या वसतिगृहातून काम करणारे अधीक्षक ,स्वयंपाकी , मदतनीस व सुरक्षा रक्षक यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असताना त्यांना किमान वेतन हि मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष मारुती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली २३ जानेवारी रोजी इगतपुरी ते हुतात्मा चौक मुंबई येथ पर्यंत पायी लॉन्ग मार्च चे आयोजन करून हे सर्व कर्मचारी मुंबईच्या दिशेने भिवंडी तालुक्यातून मार्गस्थ झाले .
ही सर्व वसतिगृह शासन मान्यताप्राप्त असतानाही या ठिकाणी जबाबदारीने काम करणाऱ्या अधीक्षकास ९२०० , स्वयंपाकी - ६९००,मदतनीस ५७५० असे तुटपुंजे मानधन दिले जात असून शासन किमान वेतन हि देऊ शकत नसल्याने शासना समोर आपली कैफियत मांडण्यासाठी या लॉंगमार्च मध्ये सहभागी स्री पुरुष असे शेकडो कर्मचारी सहभागी असून या पायी प्रवासात सगळे थकले भागलेले असतानाही आपल्या न्याय हक्कासाठी झगडण्यासाठी आपण मुंबईच्या दिशेने निघालो असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मारुती कांबळे यांनी दिली आहे .
दरम्यान दिवसभर पायी चालत निघालेल्या या कर्मचाऱ्यांच्या वेदना जीवघेण्या असून या पायी लॉन्ग मार्च मध्ये सहभागी प्रदीपकुमार वाकपैंजण - यवतमाळ, शालिनी चव्हाण - भंडारा, भाऊ कुनघाटकर -चंद्रपूर ,धन्नापा मोरे - सोलापूर , हे कर्मचारी पायी चालत असल्याने त्यांना भोवळ येऊन पडल्या होत्या त्या सर्वाना पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले . शासन आमच्या आंदोलनाकडे कानाडोळा करीत असून आम्ही मुंबई येथे मुख्यमंत्री , उप मुख्यमंत्री ,सामाजिक न्याय मंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आमची कैफियत मांडणार असून आम्हला न्याय मिळे पर्यंत हे आंदोलन सुरु राहील असे मारुती कांबळे यांनी सांगितले .
Post a Comment