कल्याण डोंबिवलीत कोरोना लसीचे टाळ्या वाजवत स्वागत
कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याणच्या रूक्मिणी बाई रुग्णालयात कोरोना लसीचे पहिल्या टप्प्यातील सहा हजार डोस बुधवारी प्राप्त झाल्याने रूग्णालय स्टाँफ, हेल्थ वर्कर यांनी टाळ्या वाजवून उत्साहात कोरोना लसीचे स्वागत केले.
एमएमआर रिजन मध्ये कोरोनाचे जास्त रूग्ण मुंबई नंतर केडीएमसी क्षेत्रात आढळले होते. बुधवारी कोरोना लसीचे ६ हजार डोस कल्याणात आल्याने मोठ्या जल्लोषात लसीचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. १३ मार्च २०२० रोजी केडीएमसी क्षेत्रात पहिला रूग्ण आढळला आणि १३ जानेवारी रोजी २०२१ रोजी कोरोना लसीचे पहिल्या टप्प्यात ६ हजार डोस सिरम इस्ट्युटकडुन आले आहेत.
कल्याणातील मनपाच्या रूक्मिणी बाई रूग्णालयात लसीकरणासाठी आल्याने बुधवारी संध्याकाळी हेल्थ वर्कर आणि रुक्मिणी बाई रूग्णालय स्टाँफने मोठ्या जल्लोषात टाळ्या वाजवून लसीचे स्वागत केले. १६ जानेवारी मनपा यादीनुसार डाँक्टर, नर्स, हेल्थ वर्कर अशा वैद्यकीय क्षेत्रातील ५ हजार ५०० व्यक्तींना पहिल्या टप्प्यात कोरोना लसीचे डोस दिले जाणार आहेत.

Post a Comment