प्रेमाची फूस लावून अल्पवयीन पीडितेचे गुजरात वरून अपहरण करणाऱ्याला बेड्या
भिवंडी , प्रतिनिधी : गुजरात राज्यातील भडोच शहरातून एका २३ वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून अपहरण केल्याची घटना घडली होती. हा आरोपी पीडित मुलीसोबत भिवंडी तालुक्यातील ठाकुरपाडा, रांजणोली येथे राहत असल्याची खबर पोलीस उपनिरीक्षक जिवन शेरखाने यांना लागताच त्यांनी या ठिकाणी पथकासह सापळा रचून ताब्यात घेऊन आरोपीला गुजरात पोलीसांच्या ताब्यात दिले. कुमार मंडल, (वय, २३) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.
वर्षभरापूर्वी पीडितेचे अपहरण आरोपी कुमार मंडल हा गुजरातमधील अंकलेश्वर, भडोच शहरात एमआयडीमध्ये मजुरीचे काम करीत होता. त्यावेळी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख करून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर डिसेबर २०१९ मध्ये तिचे अपहरण करून तिच्या सोबत तालुक्यातील ठाकुरपाडा,रांजणोली येथे एका खोलीत राहत होता. विशेष म्हणजे पीडितेच्या अपहरण प्रकरणी गुजरात राज्यातील अंकलेश्वर, भडोच येथील जी आय.डी.सी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा पीडितेच्या नातेवाईकांनी केला होता. तेव्हापासून तो कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता.
तर दुसरीकडे गुप्त बातमीदाराने पोलीस उपनिरीक्षक जिवन शेरखाने यांना पीडित मुलीची माहिती मिळताच त्यांनी सदरची बाब वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे सांगून पोलीस उपनिरीक्षक डी. एस. नांगरे, पोहवा, राजेंद्र धुमाळ, मपोशी सवीता नागपुरे, निलम सातवी, पोशि भागवत दहीफळे या पोलीस पथकाने पीडित मुलीला ठाकुरपाडा, रांजणोली येथुन ताब्यात घेवुन तीचेकडे पोलीस ठाणेस आणुन चौकशी केली असता तीने आरोपी अनील कुमार याने प्रेमाचे आमीष दाखवुन जबरदस्तीने पळवुन आणल्याचे सांगीतले. त्यावरून पोलीस पथकाने भडोच, गुजरात येथे चौकशी केली असता नमुद अनुषंगाने जी आय.डी.सी पोलीस ठाण्यात १६ डिसेंबर २०१९ रोजी भादवि कलम ३६३,३६६, सह पोक्सो कलम १२ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तेव्हापासुन गुजरात पोलीस पीडित मुलीचा शोध घेत होते.
आरोपीला दिले गुजरात पोलीसाच्या ताब्यात ..
पीडित मुलीचे अपहरण करणारा अनील कुमार मंडल याला पुढील कार्यवाहीकरीता कोनगाव पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खळबळजनक बाब म्हणजे अल्पवयीन पीडित मुलीवर प्रेमाचे आमिष दाखवून आरोपीने अत्याचारही केल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे. यापुढील तपास गुजरात पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे.

Post a Comment