Header AD

कल्याण तालुक्यातील २० ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर एक ग्राम पंचायत बिन विरोध
डोंबिवली , शंकर जाधव :  कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतिचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोना काळातही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम दिसून आला. कल्याण तालुक्यात एकूण २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या यामधे एकूण २११ जागा होत्या. त्यापैकी ४७ जागांवर बिनविरोध निवडणुका झाल्या. तर १६४ जागांसाठी ३८२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यापैकी ७ ग्रामपंचायतीत शिवसेना ११ ग्रामपंचायतीत भाजप आणि २ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. 

 


कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७४ प्रभाग संख्या असून २११ सदस्य आहेत. या निवडणुकीत ३१ हजार १४७ महिला मतदारांची संख्या तर २७ हजार १३७ पुरुष मतदारांची अधिकृतपणे नोंद करण्यात आली होती. या ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकला प्रसंगी १६७ उमेदवारांना मतदारांनी कौल देऊन विजयी केले आहे. मत मोजणी ठिकाणी रक्ताची नाती परस्पर विरोधात निवडणूक लढवत असल्याने चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला चढलेला राजकीय रंग अजूनच उजळल्याचे चित्र मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राजवळ ठिकाणी दिसून आले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या निकाल लागणार असल्याने प्रत्येक उमेदवारासह  पक्षाने ही निवडणूक जिंकण्यासाठी सामदामदंड भेद सर्रासपणे वापरण्याचे चित्र निवडणूक काळात दिसून आले.पोलिसांचे सहकार्य चांगले  लाभल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. शिवसेनेचे भारत जयराम केने आणि भाजपचे कल्पेश मंगल पाटील या संगोडा गावातील वॉर्ड क्रमांक ३ येथील या दोन उमेदवरांच्या मताची बरोबरी झाल्याने  अडीच अडीच वर्ष सदस्य पद देण्याचे मंजूर करण्यात आले. मात्र पहिला सदस्य कोण यासाठी सोडत उडवून नाव जाहीर करण्यात आले. 

कल्याण तालुक्यातील २० ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर एक ग्राम पंचायत बिन विरोध कल्याण तालुक्यातील २० ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर एक ग्राम पंचायत बिन विरोध Reviewed by News1 Marathi on January 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads