Header AD

वास्तुविशारद स्पर्धेत भारतातून डोंबिवलीची `संस्कृती पाटील` दुसरी

  डोंबिवली , शंकर जाधव   :  लिव्हिंग पिटीसी इंडिया या आंतरराष्ट्रीय मासिकाद्वारा आंतरराष्ट्रीय स्तरावर डिझाईन चॅलेंज या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे घरातील कमीत कमी जागेच्या वापरत वेगवेगळ्या फर्निचरची सजावट व तिचा वापर कसा कराल यासंदर्भात ही स्पर्धा होती. या स्पर्धेत डोंबिवलीतील संस्कृतीने भारतातून दुसरा क्रमांक पटकावला असून डोंबिवलीचे नाव देशात पुन्हा एकदा उज्वल केले आहे. तर दिल्लीतून दीक्षा सिंग हीचा पहिला क्रमांक आला.


कोरोना काळात राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले होते. संपूर्ण भारतातून विविध वास्तू विशारदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डोंबिवलीतील संस्कृती गुरुनाथ पाटील ही भारतातून दुसरी आली आहे. संस्कृती भारतीय विद्यापीठ येथून वास्तुविशारद अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असून ती दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
वास्तुविशारद स्पर्धेत भारतातून डोंबिवलीची `संस्कृती पाटील` दुसरी वास्तुविशारद स्पर्धेत भारतातून डोंबिवलीची `संस्कृती पाटील` दुसरी Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads