Header AD

सोनाळे ग्राम पंचायत निवडणूकीत दोन गटात हाणामारी प्रकरणी आठ जणांना अटक

भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडीत ग्राम पचायतींच्या निवडणुकीत सोनाळे येथे जिल्हा परिषद शाळे बाहेर मतदान करण्यावरून दोन गटात हुज्जत होत हाणामारीची घटना घडली असून यामध्ये एकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून दोन जण किरकोळ जखमी झालंयाने दोन्ही गटातील ८ जना विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केले आज न्यायालयात हजर केले असता  न्यायालयीन कास्टडी सुनावण्यात आली.


 सोनाळे गावात  जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रात वयोवृद्धां सोबत मदत करण्यासाठी जाणारे सहकारी हेच बटन दाबून मत नोंदवीत असल्या बद्दल एक गटाने आक्षेप घेत त्या वरील दोन गटात हुज्जत होऊन शाब्दिक चकमक होत असतानाच मतदान केंद्र बाहेर दोन्ही गटातील नागरीक जमा होऊन मोठा जमाव जमा झाला व त्यांच्यात हाणामारी सुरू झाली असता तेथे  एक व्यक्तीने लाकडी दांडक्याने मारहाण केली.या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पिटाळून लावले .या मारहाणी चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे .दरम्यान या हाणामारीत जयनाथ चरपट पाटील यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून दोन्ही गटातील फिर्यादी अनुक्रमे भावेश बाळाराम पाटील व सुशांत बाळाराम पाटील हे किरकोळ जखमी आहेत.


भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटाने एकमेकां विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी दोन्ही विरोधात गुन्हा दाखल करुन उमेदवार तथा युवक काँग्रेस भिवंडी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांसह किशोर पाटील,भावेश पाटील ,नितेश पाटील यांसह विरोधी गटातील नवनाथ पाटील ,भरत पाटील,लैलाथ पाटील ,गणेश पाटील दोन्ही गटातील एकूण आठ जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे व पोलीस कर्मचारी कैलास वाढविंदे ,अनिल महाजन हे पथक करीत आहे .
सोनाळे ग्राम पंचायत निवडणूकीत दोन गटात हाणामारी प्रकरणी आठ जणांना अटक सोनाळे ग्राम पंचायत निवडणूकीत दोन गटात हाणामारी प्रकरणी आठ जणांना अटक  Reviewed by News1 Marathi on January 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads