Header AD

कल्याण डोंबिवलीत ९५ नवे रुग्ण, तर एक मृत्यू

 

◆५९,१६१ एकूण रुग्ण तर १११९ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ११४ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात आज नव्या ९५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ११४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


       आजच्या या ९५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,१६१ झाली आहे. यामध्ये १०५५ रुग्ण उपचार घेत असून ५,९८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०कल्याण प -३६, डोंबिवली पूर्व १९डोंबिवली प – १४, तर  मांडा टिटवाळा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 


         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून,  ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून तसेच ११ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ९५ नवे रुग्ण, तर एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ९५ नवे रुग्ण, तर एक मृत्यू  Reviewed by News1 Marathi on January 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads