Header AD

ठाणे जिल्हाधिकारी आदेशाने अवैध्य रित्या रेती उपसा व वाहतुकी विरूद्ध धडक कारवाई
भिवंडी , प्रतिनिधी   :  ठाणेअपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांनुसार उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नलदकर व तहसीलदार अधिक पाटील निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे भिवंडी, मंडळ अधिकारी खारबाव व मंडळ अधिकारी अप्पर भिवंडी, तलाठी कर्मचारी पोलीस उपायुक्त व सहकारी अधिकारी यांनी  संयुक्तपणे काळ मध्यरात्री पासून ते आज सकाळी पर्यंत  काल्हेर कशेळी ते कोन पर्यंतच्या खाडी पात्रामध्ये अवैध्यरित्या रेती उपसा व वाहतुकीविरूद्ध धडक कारवाई करण्यात आली. सदरच्या कारवाईमध्ये ३ सक्शन पंप व ३ बार्ज खाजगी बोटीच्या साहाय्याने पकडले व खाडी किनारी आणून हायड्राद्वारे किनाऱ्यावर काढून गॅस कटरच्या साह्याने तुकडे करून नष्ट करण्यात आले.  वरील मालमत्तेची अंदाजे किंमत ३० लाख रुपये आहे.


तसेच अनधिकृत रेती वाहतूक करणारी एकूण ५ वाहने पकडण्यात आली असून त्यामध्ये सुमारे  १० ब्रास एवढी अवैद्य रेती आढळून आली. सदर अवैद्य रेतीची किंमत अंदाजे रक्कम रूपये १० लाख एवढी होत आहे. सदरची वाहने जप्त करून दंडनीय कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आली आहेत या कारवाईने कल्याण व भिवंडीतील रेती माफिया व अवैध वाहतूक करणार्याचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी आदेशाने अवैध्य रित्या रेती उपसा व वाहतुकी विरूद्ध धडक कारवाई ठाणे जिल्हाधिकारी आदेशाने अवैध्य रित्या रेती उपसा व वाहतुकी विरूद्ध धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads