Header AD

झाडांना वेदनामुक्त करून कल्याण शहरांत नववर्षाचे अनोखे स्वागत अंघोळीची गोळी संस्थेचा खिळेमुक्त झाडं उपक्रम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अंघोळीची गोळी टीमने नववर्षाच्या सुरुवातीला कल्याण शहरांतील झाडांवरील खिळे काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत पण फक्त त्यांना बोलता येत नाही त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वेदना आम्हांला ऐकू येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगत खिळेमुक्त झाडाच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम राबवला.


हा उपक्रम मुंबईतील विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील यांनी यावेळीं केले. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्तपोस्टरमुक्तबॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण संरक्षण अधिनियममहाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियममहाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे असे खिळेमुक्त झाडं मोहिमेचे महाराष्ट्र समन्वयक तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले.


मोहिमेत स्वप्नील शिरसाठभुषण राजेशिर्के या युवकांनी सहभाग घेतला. वृक्ष संवर्धनासाठी महानगरपालिकेलाही सातत्याने पत्रव्यवहार केला जात असल्याचे या युवकांनी यावेळीं सांगितले.

झाडांना वेदनामुक्त करून कल्याण शहरांत नववर्षाचे अनोखे स्वागत अंघोळीची गोळी संस्थेचा खिळेमुक्त झाडं उपक्रम झाडांना वेदनामुक्त करून कल्याण शहरांत नववर्षाचे अनोखे स्वागत अंघोळीची गोळी संस्थेचा खिळेमुक्त झाडं उपक्रम Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads