Header AD

भिवंडीतील सरवली एमआयडीसी मध्ये भीषण आग दहा तास आग धुमसत राहिली आग

  
भिवंडी , प्रतिनिधी  : भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी मधील कपिल रेयॉन प्रा लिमिटेड या अत्याधुनिक यंत्रमागावर कपडा तयार करणाऱ्या कंपनीला बुुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे .तळ अधिक दोन मजले असलेल्या कंपनीच्या वरच्या मजल्यांवर सायझिंग ,वारपीन मशीन सह अत्याधुनिक यंत्रमाग असून दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर तयार कपडा व कच्चामाल मोठ्या प्रमाणावर साठविलेले असलेल्या ठिकाणी ही आग लागल्याने पाहता पाहता आगी ने  रोद्ररूप धारण करीत संपूर्ण कंपनीची इमारत आगीच्या भक्ष्य स्थानी पडली .आगीची माहिती कळताच भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी पोहचली परंतु आगीचे स्वरूप पाहता ठाणे,कल्याण,
उल्हासनगर ,येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले .


          एकूण ५ अग्निशामक दलाच्या गाड्यांसह तीन खाजगी टँकर द्वारा  आगी वर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले परंतु पाण्याची कमतरता भासत असल्याने तब्बल दहा तास ही आग धुमसत राहिली व त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलास यश मिळाले असून संपूर्ण आग विझविण्यासाठी पुढील दहा ते बारा तास लागू शकतात अशी माहिती अग्निशामक दलाच्या कर्तव्यावर हजर कर्मचारी यांनी दिली आहे.या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ३ वारपिंग ,१ सायझिंग मशीन सह ७७ अत्याधुनिक यंत्रमाग व कच्चामाल व तयार कापड असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.प्रथमदर्शनी आग ही दुसऱ्या मजल्यावरील वारपिंग असलेल्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने लागल्याचे समजते .


          दरम्यान एवढ्या मोठ्या एमआयडीसी क्षेत्रात स्वतंत्र अग्निशामक यंत्रणा नसून पाणी साठवणूक क्षमता ही नसल्याने अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारण्यास सुरूवात केल्यावर अवघ्या दहा मिनिटांमध्ये पाणी संपत असल्याने पाणी भरण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना सुमारे चार किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी भरून यावे लागत असल्याने आग पुन्हा भडकत होती .त्यामुळे ही आग तब्बल दहा तास धुमसत राहिली.त्या नंतर आगी वर नियंत्रण मिळविण्यात आले आहे परंतु कुलिंग चे काम अजून पुढे किमान दहा तास सुरू राहिल अशी माहिती भिवंडी अग्निशामक दलाचे जवान विजय जाधव यांनी दिली आहे .
भिवंडीतील सरवली एमआयडीसी मध्ये भीषण आग दहा तास आग धुमसत राहिली आग भिवंडीतील  सरवली एमआयडीसी मध्ये भीषण आग दहा तास आग धुमसत राहिली आग Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads