एस् टी. इंटकच्या अध्यक्ष पदी सचिन शिंदे ...
ठाणे , प्रतिनिधी : महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक ठाणे विभागाचे अध्यक्षपद स्व.बाळकृष्ण पुर्णेकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वर्ष सक्षमपणे सांभाळले होते,पुर्णेकरांच्या अपघाती निधनानंतर हे पद अनेक वर्षे रिक्तच होते.पुर्णकरांच्या जागी कोण हा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यां समोर होता पण आता मार्ग निघाला आहे.पुर्णेकरांचे शिष्य असलेले ठाणे काँग्रेसचे सचिन शिंदे यांना हे पद देण्यात यावे,सचिन शिंदे पुर्णकरांनी केलेले एस्.टी.कर्मचाऱ्यांचे नेतृत्व पुढे सक्षमपणे करु शकतात अशी आग्रही मागणी सातत्याने संघटनेचे राज्य अध्यक्ष मा.जयप्रकाश छाजेड यांच्याकडे ठाणे विभागातील इंटक पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याने छाजेड यांनी अखेर सचिन शिंदे यांच्या ठाणे विभागाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठीचा हिरवा कंदील दाखवला.
अध्यक्षपदाच्या निवडिसाठी ठाणे शहर काँग्रेस कार्यालयात एसटी इंटकची एक तातडीची बैठक बुधवार दि.१३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती .सदरप्रसंगी ठाणे विभागाचे कार्याध्यक्ष शामराव भोईर यांनी सचिन शिंदे साहेबांच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्ती चा प्रस्ताव मांडला याला ठाणे विभागाच्या विविध डेपोतून आलेल्या इंटक पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा देत अध्यक्षपदाचा हा प्रस्ताव तात्काळ मंजुर केला. सचिव शांताराम पाटील ,सहसचिव मनेश सोन कांबळे, कार्याध्यक्ष शाम भोईर यांनी एसटी इंटकच्या नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.सचिन शिंदे यांचे पुष्पगुच्छ देउन तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
"स्व.बाळकृष्ण पुर्णेकर हे माझे राजकारणातील सर्वेसर्वा असल्याने मी त्यांच्या सोबत सावली सारखा असायचो काँग्रेस पक्षाच्या कामाबरोबरच पुर्णकर हे काँग्रेस प्रणीत इंटक युनियनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असल्याने पुर्णेकरांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या अनेक कार्यक्रमात,विविध आंदोलनात सहभागी होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रक्ष्नांची मला जाण आहे, पुर्णेकर साहेबांनी सांभाळलेले अध्यक्षपद मला देण्याचा जो विश्वास आदरणीय जयप्रकाश छाजेड यांनी माझ्या बाबत दाखवला आहे.
हा विश्वास मी सार्थ ठरवेन तसेच पुर्णेकर साहेबांचा वारसा मला पुढे चालवायचा आहे याची मला पुर्णपणे जाणीव असल्याचे उद्गार अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सचिन शिदे यांनी काढले,एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोमाने कामाला लागुया असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन शिंदे यांनी इंटक पदाधिकाऱ्यांना केले आहे.सचिन शिंदे यांच्या निवडीचे ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक अँड.विक्रांत चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी स्वागत केले आहे.

Post a Comment