Header AD

एमजी हेक्टर २०२१' चे इंटेरिअर असेल अद्ययावत आणि आकर्षक इंटेरिअरची माहिती झाली लीक

  
मुंबई, ३ जानेवारी २०२१ : वर्ष २०१९ पासून भविष्यातील आव्हानं आणि संधीना ओळखत एमजी मोटर इंडिया नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनं लॉंच करत आहे. याच दरम्यान पुढच्या महिन्यात लॉन्च अपेक्षित असणा-या 'एमजी हेक्टर २०२१' च्या इंटेरिअर संबंधित माहिती उघड झाली असून ते अद्ययावत आणि आकर्षक असणार आहे. ही अपडेटेड एसयूव्ही सिंगल टोन (ब्लॅक) इंटेरिअर, ड्युएल-टोन इंटेरिअर, ड्युएल टोन-एक्सटेरिअर अशा अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.


हेक्टर २०२१ मध्ये वायरलेस चार्जिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स (या सेगमेंटमध्ये प्रथमच) असतील. तसेच यात बेज व ब्लॅक अशा ड्युएल टोनमध्ये इंटेरिअरचा पर्याय असेल. जेणेकरून केबिन अधिक हवेशीर व प्रीमियम अनुभव देईल.


एमजी हेक्टरने भारतात देशातील पहिली इंटरनेट एसयुव्ही एमजी हेक्टर, पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही एमजी झेडएस ईव्ही आणि पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर सादर केली आहे. या सर्वांना ग्राहकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. एमजी मागील ९६ वर्षांमध्ये एक आधुनिक, फ्यूचरिस्टिक आणि इनोव्हेटिव्ह ब्रँडच्या रुपात विकसित झाला आहे. एमजी मोटर इंडियाचा गुजरातमधील हलोल येथे स्वत:चा कार निर्मिती प्रकल्प आहे. त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ८०,००० वाहनांची असून तेथे जवळपास २,५०० कामगार आहेत.

एमजी हेक्टर २०२१' चे इंटेरिअर असेल अद्ययावत आणि आकर्षक इंटेरिअरची माहिती झाली लीक एमजी हेक्टर २०२१' चे इंटेरिअर असेल अद्ययावत आणि आकर्षक इंटेरिअरची माहिती झाली लीक Reviewed by News1 Marathi on January 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads