Header AD

कल्याण गौरीपाडा येथील मुला-मुलींच्या वसति गृहाचे काम अपूर्ण अर्बन सेलच्या प्रविण मुसळेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील शासनाच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या महाराष्ट्रातील मुला-मुलींच्या वसतिगृहाचे काम अपूर्ण असून याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन याप्रकरणात लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.


सन २०१५ मध्ये कल्याणात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी मुलींचे वसतिगृह होणेबाबत मुद्दा घेतला होता. त्या अनुषंगाने गौरीपाडा येथे सुमारे रूपये ५ कोटी निधीतुन सार्वजनिक बांधकाम विभागाने मुलींचे शासकीय वस्तीगृह बांधणेतसेच मुलांचे वसतिगृह बांधण्याचे काम सुरू झाले. प्रत्यक्ष काम सुरू होऊन तीन वर्षी झाली असुन या वसतिगृहाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मुला-मुलींच्या  वसतिगृहाच्या प्रश्नात लक्ष घालुन मुला-मुलींना कल्याणातील इमारतीची सुविधा लवकर उपलब्ध होण्यासाठी हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्बन सेलचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रविण मुसळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन केली आहे.


       त्याचबरोबर मुसळे यांनी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, संबंधित खात्याचे मंत्री धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता विलास कांबळे, कार्यकारी अभियंता अनिता परदेशी यांनाही निवेदन दिले आहे.

कल्याण गौरीपाडा येथील मुला-मुलींच्या वसति गृहाचे काम अपूर्ण अर्बन सेलच्या प्रविण मुसळेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट कल्याण गौरीपाडा येथील मुला-मुलींच्या वसति गृहाचे काम अपूर्ण अर्बन सेलच्या प्रविण मुसळेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट Reviewed by News1 Marathi on January 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads