नववर्षात मानवी मुल्ये अंगी कारण्याचा संकल्प करावा निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज
कल्याण ,कुणाल म्हात्रे : ‘‘निराकार ईश्वराला हृदयामध्ये धारण करुन नववर्षामध्ये मानवी मूल्यांचा अंगिकार करत सर्वांशी सद्व्यवहार करण्याचा संकल्प करावा आणि प्रत्येकाने आत्मसुधार करुन जगासाठी वरदान बनावे.’’ असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी नुतन वर्षानिमित्त व्हर्च्युअल रुपात आयोजित केलेल्या सत्संग समारोहामध्ये व्यक्त केले. जगभरात पसरलेल्या लाखो निरंकारी भक्तांनी संत निरंकारी मिशनच्या वेबसाईटच्या माध्यमातून या सत्संग समारोहाचा आनंद प्राप्त केला.
सद्गुरु माता जी म्हणाल्या की, मागील वर्षी आपण पारिवारिक रुपात, सामाजिक रुपात तसेच अवघ्या वैश्विक स्तरावर मानवी गुणांनी युक्त होऊन सर्वांशी चांगला व्यवहार करण्याची शिकवण प्राप्त केली. याबरोबरच आणखीही अनेक प्रकारचे धडे गेल्या वर्षभरात आपल्याला मिळाले. ती सर्व शिकवण आपल्या अंत:करणात धारण करुन आपण नवीन वर्षात प्रवेश करावा. आपल्यामध्ये ज्या उणीवा आहेत त्याही निराकार ईश्वराचा आधार घेऊन सुधारत जावे.
सद्गुरु माताजींनी निराकार ईश्वराकडे सर्वांसाठी अशी प्रार्थना केली, की यावर्षी सर्वकाही सामान्य होत जावे, सर्वांची प्रकृती स्वस्थ राहावी आणि सत्संग, सेवा, स्मरण करत ब्रह्मज्ञानाचा सांभाळ करुन ईश्वरावरील आपला विश्वास आणखी सदृढ करत जावे.

Post a Comment