Header AD

बर्ड फ्ल्यू बाबत ‘अ’ प्रभागात जनजागृती
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण परिसरात बर्ड फ्ल्यूची एन्ट्री झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमता निर्माण झाली असून अनेकांमध्ये घबरहाट पसरली आहे. नागरिकांच्या मनातील हि भीती दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्यामार्फत जनजागृती केली जात आहे.


"अ" प्रभाग क्षेत्रातील अटाळी  गावांतील एका घरात काही पाळीव कोंबड्यांचा मृत्यू झाला होता.  मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील पशुवैद्यकिय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल  पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले होते असून पशुसंवर्धन विभागानेही या सदंर्भात मनपा आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांना कळविले होते. आयुक्त च्या मार्गदर्शनानुसार  अटाळी मध्ये  बर्ड फ्लूच्या संदर्भात एक किलोमीटर परिसरात माइक व स्पीकरच्या सहाय्याने जनतेत जनजागृती केली जात आहे.


कोणाकडे पाळीव पक्षी असल्यास त्यांनी स्वतः हुन माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे कळवावे अशी सूचना अटाळी गाव व आजूबाजूच्या परिसरात प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी देत या १ किमी. परिसरात उघड्यावर चिकन विकण्यासाठी मज्जाव करण्यात आला असुन परिसरात सँनिटायझर फावरणी, धुरावणी मोहिम राबवित निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर नागरिकांनी घाबरून न जाता पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन देखील मोकल यांनी केले आहे.  

बर्ड फ्ल्यू बाबत ‘अ’ प्रभागात जनजागृती  बर्ड फ्ल्यू बाबत ‘अ’ प्रभागात जनजागृती Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads