अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ सुनील गायकवाड माजी खासदार भाजपा
ठाणे , प्रतिनिधी : अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी रू. अशी भरीव वाढ केल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खऱ्या सुकर झाला आहे.आत्तापर्यंत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या 'पीएमएस-एससी' या योजने अंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही पुरेशी नव्हती तसेच या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या . केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे.
शिष्यवृत्ती चे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता, आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बँकेचे तपशील पडताळून ऑनलाईन (डीबीटी ) पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. असे यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माजी खासदार सुनील गायकवाड यावेळी बोलत होते. या पत्रकार परिषदेवेळी ठाणे शहर.जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे,ठाणे शहर आ.संजय केळकर,प्रदेश उपाध्यक्ष मधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले व अनु सूचित जाती मोर्ध्या चे ठाणेशहर अध्यक्ष वीरसिंग पारछा उपस्थित होते.

Post a Comment