Header AD

सर्पमित्राने दिले ४ सापांना जीवदान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  मानवी वस्त्यांमध्ये सापांचा वावर वाढला असून जंगलातील नैसर्गिक अधिवासात रहिवास करणारे साप थंड वातावरणामुळे काँक्रीटच्या जंगलात फिरकत आहेत. साप आढळल्याने सर्पमित्र कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोचून या सापना जीवदान देण्याचा प्रयत्न करतात.  गुरुवारी एकीकडे नागरिक २०२० या सरत्या वर्षाला निरोप देण्यात व्यस्त असताना सर्पमित्रांनी मात्र २ बिन विषारी आणि २ विषारी सापाना जीवदान दिले आहे.


कल्याणातील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या आवारातून विषारी घोणस जातीचा साप तर  आयुष हॉस्पिटलच्या पॅसेज मधून आणि ऑर्डीनन्स कंपनीच्या आवारातून असे दोन धामण साप सर्पमित्र दत्ता बोंबे आणि त्यांच्या सहकार्यांनी पकडले. तर गुरुवारी रात्री उशिरा उंबर्डे रस्त्याजवळील चहाच्या टपरीखाली विषारी हरणटोळ हा पूर्ण वाढ झालेला साप सर्प मित्रांनी पकडला असून वनविभागाचे वनपाल एम डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सापांना जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती दत्ता बोंबे यांनी दिली.


सर्पमित्राने दिले ४ सापांना जीवदान सर्पमित्राने दिले ४ सापांना जीवदान Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

जिवलग मित्र परिवाराने भरली गरीब विद्यार्थांची वार्षिक फी

  डोंबिवली ( शंकर जाधव )   जिवलग मित्र परिवार डोंबिवली एमआयडीसी पूर्व च्या वतीने   ९   गरजू  विद्यार्थांची  वार्षिक फी भरुन सामजिक   बांधिलक...

Post AD

home ads