Header AD

६०वर्षीय वृध्द महिलेचा पोलीसांच्या सतर्कते मुळे वाचला जीव


◆कल्याण नगर महा मार्गावरील‌ रायते नदी पुला वरील घटना...

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  पोलीसांच्या सतर्कतेमुळे  एका ६० वर्षीय वृध्द महिलेचा जीव वाचल्याची घटना कल्याण नगर महामार्गावरील‌ रायते नदी पुलावर घडली आहे.

कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावरील‌ रायते गावाजवळ उल्हासनदीतच्या पुलावरून उडी मारून एक ६० वर्षी वृध्द महिला मंगळवारी आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. यावेळी गोवेली कडून म्हारळच्या दिशेने गस्तीवर जाणाऱ्या टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांच्या हि घटना निदर्शनास आली. त्यांनी  तात्काळ गाडी थांबवत त्यांच्या सोबत असणारे पोलिस उपनिरीक्षक कमलाकर मुंढेपोलिस कर्मचारी सोमनाथ भांगरे व चालक उत्तम घोडे यांनी सदर महिलेच्या दिनेश धावले. सदर महिलेला मुंढे व भांगरे यांनी पकडून पुलाचे रेलिंग मधून व्यवस्थित बाहेर काढत आपल्या गाडीतून पोलिस ठाण्यात आणले.


सदर वृध्द महिला ही कल्याण येथील गुरूनानक शाळेजवळी सदानंद कॉलनी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. घरगुती कलहमुलगा व्यवस्थित देखभाल करत नाही तसेच आजारपण याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे वृध्द महिलेने पोलिसांना सांगितले. सदर महिलेला पोलीसांनी म्हस्कल येथील निराधार महिलांच्या संवर्धन फाउंडेशन येथे दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली. 

६०वर्षीय वृध्द महिलेचा पोलीसांच्या सतर्कते मुळे वाचला जीव ६०वर्षीय वृध्द महिलेचा पोलीसांच्या सतर्कते मुळे वाचला जीव Reviewed by News1 Marathi on January 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads