Header AD

मांडा-टिटवाळा येथील अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यास ठिय्या आंदोलन


◆माजी उपमहापौर नगरसेविका उपेक्षा भोईर यांचा पालिका प्रशासनाला इशारा....

   

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवलीच्या "अ" प्रभागक्षेत्रातील प्रभाग क्र. ९मांडा-टिटवाळा पूर्व येथील निमकर नाका ते सावरकर नगर- इंदिरानगर या रस्त्याचे भिजत घोंगडे अद्यापही कायम असून ८ वर्ष उलटूनही हे काम अद्यापही अर्धवट राहिले आहे. त्यामुळे येथील भाजपच्या माजी उपमहापौरनगरसेविका उपेक्षा भोईर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनास निवेदन दिले असून निवेदनाची दखल न घेतल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका भोईर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालिका आयुक्त आणि शहर अभियंता सपना कोळी यांना दिले आहे.


या रस्त्याचा ठेका हा कोणार्क कंपनीने घेतला आहे. सदर काम हे सन २०१३ साली सुरु झाले होते. परंतु सदर ठेकेदाराने हे काम संथगतीने सुरु केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गटारेफुटपाथडांबरीकरण असे सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी आपण गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. परंतू प्रशासन हे दरवेळी याकडे कानाडोळा करत असल्याचे माजी उपमहापौर, नगरसेविका उपैक्षा भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. २ दिवसात हे प्रलंबित काम सुरु न केल्यास दिनांक १९ जानेवारी रोजी प्रशासना विरोधात आपल्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी दिला आहे.

मांडा-टिटवाळा येथील अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यास ठिय्या आंदोलन मांडा-टिटवाळा येथील अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यास ठिय्या आंदोलन Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads