Header AD

आरएसपी युनिट तर्फे कोरोना काळात मदत करणाऱ्या समाजसेवकांचा देवदूत म्हणून सन्मान


अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत वाहतुकीचे नियम परिपाठात घेणे आवश्यक अरविंद देशमुख...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व रस्ता सुरक्षा सप्ताह च्या माध्यमातूनकल्याण डोंबिवली, नवी मुंबई  मुंबई  येथील कोवीड काळात उत्कृष्ठ कार्य केलेल्या आर.एस.पी अधिकारी, मिस इंडीया गौरी गिरासे तसेच कल्याण येथील कोरोना काळात आरएसपी अधिकारी युनिट कल्याण-डोंबिवली यांना समाजसेवेसाठी उदार भावनेने मदत करणाऱ्या संस्थांसमाजसेवका तसेच हितचिंतक दानशूर नागरिकांचा सत्कार करण्यात आला.कल्याण पश्चिमेतील सरस्वती मंदिर शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय वक्ता डाँ. पवन अगरवाल, आर.एस.पी महासमादेशक महाराष्ट्र राज्य अरविंद देशमुख, राज्यसमन्वयक गोरखनाथ पोळ, अँड.के.डी.पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, परिवहन अधिकारी दीपक शिंदे, रायगडचे अति.समादेशक किशोर राठोड, प्रशांत भामरे, सरस्वती मंदिर शाळेचे मुख्याध्यापक जयराम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते देवदूत म्हणून सन्मान करण्यात आला.
उदार हेतूने मदत करणारे जेसस इज लाईफ ट्रस्टकल्याण सामाजिक संस्था व सी एन पाटील समाजसेवक संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटीलसेंट थॉमस ट्रस्टदिव्य सेवाभावी संस्थामोहन कपुराणीनटवर वर्मा, मुकेश टेलरभरत जाधवस्वामीनारायण ट्रस्टचे दिनेश क्कर आणि संपूर्ण टीमलिओ क्लब कल्याण, प्रवीण टिळक, स्पोर्ट्स टिचर्स हेल्प फाऊंडेशनचे अविनाश ओंबासे, पत्रकार कुणाल म्हात्रेस्वप्नील शेजवळ, भरत दळवी  आदींचा देवदूत म्हणून सन्मान करण्यात आला.यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुखदेव पाटील यांनी आर एस पी युनिट च्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि रस्ता सुरक्षा सप्ताह आगळ्यावेगळ्या स्वरूपाने ऑनलाइन पद्धतीने जनसामान्यापर्यंत वाहतुकीचे नियम कसे होतील व समाजामध्ये ट्रॅफिक सेन्स कसा निर्माण होईल, जनजागृती करणारे उपक्रम आरएसपी टीम मार्फत राबविण्यात येतील असे सांगितले.


महाराष्ट्र राज्य आरएसपीचे महासमादेशक अरविंद देशमुख यांनी ठाणे जिल्हा कमांडर मनीलाल शिंपी यांच्या कार्यशैलीच्या गौरव केला व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. समाजामध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण करायची असेल तर प्रत्येक शाळेत दहा मिनिटे वाहतुकीचे नियम परिपाठद्वारे रोज समजावून सांगणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कमांडर मनीलाल शिंपी यांनी आरएसपी युनिटने केलेल्या समाजकार्याची थोडक्यात माहिती दिली.यावेळी आरएसपी अधिकारी महादेव क्षीरसागर, बन्सीलाल महाजन, केशव मालुंजकर, सचिन मालपुरे,  रामदास भोकनळ, जितेंद्र सोनवणे, रितेश पाटील, अनंत किनगे, तुषार बोरसे, नितीन पाटील, दिलीप पावरा, दत्तात्रय पाटील, योगेश अहिरे, दत्तात्रय करण जडेजा, प्रभाशंकर शुक्ला तसेच महिला आरएसपी अधिकारी भारती जाधव, मनीषा शेवडे, रेखा प्रभू, ईश्वरी चव्हाण, अंजली मिला, रूपाली सिनलकर, विधाटे, नाईक,चौधरी, सोपान शिनलकर, तानाजी सिनलकर, पालघर समादेशक गायकवाड, पत्रकार आणि कविव राजू सपकाळ, समाजसेवक सुरेश धडके आदीजण उपस्थितित होते.

आरएसपी युनिट तर्फे कोरोना काळात मदत करणाऱ्या समाजसेवकांचा देवदूत म्हणून सन्मान आरएसपी युनिट तर्फे कोरोना काळात मदत करणाऱ्या समाजसेवकांचा देवदूत म्हणून सन्मान Reviewed by News1 Marathi on January 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads