अन्नदात्यावर अन्याय होऊ देणार नाही बळीराजा सुरक्षित तर आपण सुखी रुपालीताई चाकणकर
भिवंडी , प्रतिनिधी : जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा ला उध्वस्त करणारे काही शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने केल्याने शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलं असून या कायद्याचा निषेध करून महिला शेतकरी मध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे असे सांगून देशाचा बळीराजा सुरक्षित तरच आपण सुखी असे सांगून हा मेळावा महिला शेतकरी ना दिशा देणारा आहे आसे आपल्या मार्गदर्शन पर भाषनात राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकार यांनी सांगितले आहे भिवंडी तालुक्यातील मैदे येथे भव्य शेतकरी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
भिवंडी तालुक्यातील मैदे येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे या भव्य शेतकरी महिला मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विद्या वेखंडे, सरचिटणीस शोभा म्हात्रे , भिवंडी शहर महिला अध्यक्ष स्वाती कांबळे,या तीन महिलांनी या महिला शेतकरी मेळाव्या चे आयोजन केले होते, सदर मेळाव्यात ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीन भागातील दहा ते बारा हजार महिला शेतकरी नी हजेरी लावली होती, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी महिला शेतकरी ना मार्गदर्शन केले .
याप्रसंगी शेतीमध्ये विविध प्रयोगशील शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन मानव्यरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी जिल्ह्यापरिषद चे कृषि अधिकारी यांनी शेतीविषयक विविध योजनांची माहिती दिली.तसेच उपस्थित महिलाना साडी वाटप करून हळदीं कुकू समांरभ करण्यात आला मेळाव्यास. राष्ट्रवादी कॉगेसं पक्षाचे शहापूर चे आमदार दौलत दरोडा, कृषी सभपती संजय निमसे, राष्ट्रवादी पार्टी चे कामगार सेल उपाध्यक्ष भगवान पाटील आदी सह विविध मानव्यर उपस्थित होते
अन्नदात्यावर अन्याय होऊ देणार नाही बळीराजा सुरक्षित तर आपण सुखी रुपालीताई चाकणकर
Reviewed by News1 Marathi
on
January 25, 2021
Rating:

Post a Comment