माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या पुढाकाराने विकास कामे सुरु
डोंबिवली , शंकर जाधव : प्रभाग क्र.५४ ठाकूरवाडी मधील माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या नगरसेवक निधीतून बिल्डींग व पथ रस्त्यावर चेकर्स टाईल्स व गटार बांधकामे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी समाजसेवक मुकेश पाटील,उपविभागप्रमुख किशोर सावंत,शाखाप्रमुख धनाजी चौधरी,उपशाखाप्रमुख जितेंद्र आरेकर,चंद्रकांत निगम,शाखाप्रमुख दिनेश शिवलकर,महिला उपशहर संघटक सीमा आयर,महिला शाखा प्रमुख किरण शिंदे यांसह अनेक शिवसैनिक, प्रभागातील ज्येष्ठ नागरीक आणि रहिवाशी उपस्थित होते.
माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या नगरसेवक निधीतून तुकाराम निवास,भोलेनाथ ठाकूर बिल्डींग ते सोनुबाई सदन क्र.२ बिल्डींग येथील पथ रस्त्यावर चेकर्स टाईल्स बसविण्याचे तसेच शिवमल्हार सोसायटी व सीताराम छाया येथील गटाराचे भूमिपूजन आणि सुंदर निवास ते शिवकृपा बिल्डींग येथे चेकर्स टाईल्स बसविण्याच्या कामचे भूमिपूजन ककरण्यात आले.यावेळी पाटील यांनी कोरोना काळात सरकारच्या नियमाचे पालन करा असा सल्ला उपस्थितांना दिला. तसेच जगावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे अशी देवाकडे प्रार्थना केली.

Post a Comment